लाडक्या संजूला शुभेच्छा द्यायला निलेश राणे सावंतवाडीत

निलेश राणे यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा केला वाढदिवस
Edited by: विनायक गांवस
Published on: August 19, 2022 19:12 PM
views 365  views

सावंतवाडी : भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी भाजप जिल्हा प्रवक्ते, माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जगदंब  निवासस्थानी भेट देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर निलेश राणे यांच्या उपस्थितीत केक कापून संजू परब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. निलेश राणे यांचे संजू परब हे निष्ठावंत असून दरवर्षी संजू परब यांना शुभेच्छा देण्यासाठी निलेश राणे आवर्जून उपस्थित राहतात. आजही उपस्थित राहत निलेश राणे यांनी संजू परब यांना भविष्यातील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संजू परब यांच्या कुटुंबीयांसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.