निलेश राणेंचा धमाका सुरूच ; आता 'यांचा' भाजप प्रवेश

Edited by: भरत केसरकर
Published on: August 11, 2023 19:56 PM
views 265  views

कुडाळ : गेल्या ९ वर्षात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निवडून आलेल्या खासदार आणि आमदार यांनी जनतेला पोकळ आश्वासने दिली. मात्र या पोकळ आश्वासनांची पूर्तता होऊ शकली नसल्यामुळे मोठ्या संख्येने विकासाचा धडाका लावलेल्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहे. आणि त्यांना आपल्या गावाचा विकास भाजपच्या माध्यमातून होणार हा विश्वास आहे असे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी कुडाळ भाजप कार्यालय येथे आंबडपाल, वेताळ बांबर्डे, पणदुर येथील उबाठा गट, कॉंग्रेस पक्षातील सरपंच, सदस्य, कुडाळ माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांनी भाजपात केलेल्या प्रवेशाच्या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.


कुडाळ भाजपा कार्यालय येथे आंबडपाल ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य यांच्यासह वेताळ बांबर्डे, पणदूर, कुडाळ येथील लोकप्रतिनिधी यांनी कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ संध्या तेरसे, विशाल परब, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, पप्प्या तवटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, माजी जि प सदस्य भारती चव्हाण, ओबीसी जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, जिल्हा सरचिटणीस विनायक राणे तसेच नगरसेवक, भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आंबडपाल सरपंच महेश मेस्त्री, सदस्य अभय जाधव, दृष्टी सावंत, शमिका सावंत, सचिन सावंत, तसेच वेताळ बांबर्डे तंटामुक्ती अध्यक्ष साजूराम नाईक, ओंकार नाईक, प्रीतम टेमकर, मुकुंद निवतकर, पणदूर येथील रत्नदीप सावंत, ओंकार सावंत, शुभम सावंत, समीर सावंत, माजी नगरसेवक सुनील बांदेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी सांगितले की, अशा प्रकारचे पक्ष प्रवेश होत राहणार आहेत, गेल्या ९ वर्षात फक्त लोकांना आश्वासने मिळाली आणि रद्दीमध्ये दिलेली निवेदने यापलीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार, खासदारांनी काम केलेले नाही. खोटं बोलायचं आणि मत घ्यायची एवढेच काम केलं आहे. पण आता जनता ओळखून पार झाली आहे. शिंदे- फडणवीस सरकारच्या विकास गतीला कोणी रोखू शकत नाही. आणि त्या सोबत जाण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी आणि जनता तयार झाली आहे. यापुढे भाजपात प्रवेश करण्यासाठी रांगा लागणार आहेत असे त्यांनी सांगितलं.


आमची स्पर्धा आमच्यासोबत


या मतदारसंघात आमदार वैभव नाईक हे नशिबाने आमदार झाले आहे कर्तुत्वाने नाही २०१४ मध्ये मोदी लाट होती तसेच काही राजकीय परिस्थिती वेगळी झाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये फक्त ते १० हजार मतांनी निवडून आले त्यांच्यासमोर रणजीत देसाई हे अपक्ष उमेदवार होते. अपक्ष उमेदवारासमोर त्यांचा घाम निघाला कारण त्यांनी कधीच कोणाची काम केली नाही. फक्त विरोध करायचा आणि जनतेला भडकवायचं एवढेच काम केलं हे केवळ त्यांच्या नशिबाने मिळालेली दोन वेळाची आमदारकी आहे त्यांनी कधीही सी वर्ल्ड, टाळंबा या प्रकल्पांबाबत काम केलं नाही. ते प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे आमची स्पर्धा आमदार वैभव नाईक यांच्यासोबत नाही पुढील काळात जास्तीत जास्त मते कशी मिळवून जनतेची चांगली सेवा करता येईल आणि गावागावात रखडलेला विकास पूर्ण कसा करता येईल हे आमचे काम असणार आहे असे भाजपा नेते निलेश राणे यांनी सांगितले.


कौशल्य विकास केंद्र सिंधुदुर्गात होणार


केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गचा विकास मोठ्या प्रमाणावर होणार आहे या ठिकाणी कौशल्य विकास केंद्र उभारणीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे त्यांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची साथ आहे त्यामुळे भविष्यात हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होईल यात तीळ मात्र शंका नाही. असे भाजपा नेते निलेश राणे यांनी सांगितले.