हे राणेच करू शकतात ; भजनी बुवांनी केलं कौतुक

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 04, 2023 18:24 PM
views 1927  views

कुडाळ : कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजाच्या मंडपात भजनी बुवा विनोद चव्हाण व भजनी बुवा गुंडू सावंत यांची डबलबारी झाली या डबलबारी मध्ये भजनी बुवा विनोद चव्हाण यांनी सांगितले की, कलावंतांच्या मानधनात ५ हजार रुपये एवढी वाढ व्हावी आणि ही वाढ राणेच करू शकतात असे सांगितले. ही डबलबारी ऐकण्यासाठी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे उपस्थित होते. या डबलबारी मध्ये दोन्ही भजनी बुवांनी केलेला हास्यकल्लोळांने तमाम रसिक मुग्ध झाले.


भाजप कार्यालय येथे विराजमान झालेल्या सिंधुदुर्ग राजाच्या मंडपात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत पुरस्कृत डबलबारीचा सामना आयोजित करण्यात आला होता हा डबलबारीचा सामना भजनी बुवा विनोद चव्हाण विरुद्ध भजनी बुवा गुंडू सावंत यांच्यामध्ये झाला हा डबलबारीचा सामना पाहण्यासाठी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे उपस्थित होते दोन्ही भजनी बुवा डबलबारी भजनातून प्रबोधन करत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख संपूर्ण जगभर झाली असे सांगून कलावंतांच्या मानधनात वाढ झाली पाहिजे तर ती वाढ राणे करू शकतात असे सांगून माजी खासदार निलेश राणे हे आमदार झाले पाहिजे ही सर्व सामान्य नागरिकांची इच्छा आहे प्रसंगावधान ज्या नेत्यांमध्ये आहे ते नेते म्हणजे निलेश राणे असे सांगून भविष्यात या मतदारसंघाचे आमदार निलेश राणे असतील असे या डबलबारीमध्ये भजनी बुवांनी सांगितले.