निलेश राणेंचा पाठपुरावा आणि तो प्रश्न निघाला निकाली

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 06, 2023 20:02 PM
views 579  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय रुग्णालयाच वैद्यकीय महाविद्यालयात  रूपांतर झाल्यांनंतर सुरक्षा रक्षकांची असलेली कमी संख्या हा वादाचा विषय बनला होता. या ठिकाणी पदनिर्मिती होऊनही ही पदे भरण्याची प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने होत होती. या प्रकरणी पात्र उमेदवार यांनी भाजपा नेते निलेश राणे यांच्याशी संपर्क केल्यानंतर निलेश राणे यांनी तत्काळ कामगार आयुक्त तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत या प्रकरणी मंत्रालयीन स्थरावर रखडलेल्या प्रस्तावाची माहिती घेत नवीन सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकीचा प्रश्न निकालात काढला आहे.

निलेश राणे यांच्या सुचनेनंतर सुरक्षा रक्षक महामंडळ आयुक्त यांनी तत्काळ १८ सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकीचे आदेश काढले होते त्यानुसार आज सर्व सुरक्षा रक्षक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सेवेत रुजु झाले आहेत.