
समोर काही शिल्लक ठेवणार नाही : निलेश राणे
सावंतवाडी : सावंतवाडी, कुडाळ, कणकवलीत आपली ताकद आहे. त्यामुळे थांबायची वेळ गेली. हीच ती वेळ आहे, तुम्ही तयारीला लागा. सावंतवाडी, कुडाळवर डोळा आहे. आपली किंमत मैदानात दाखवून द्या, गप्प बसण्याचे दिवस नाहीत असं मत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले. सावंतवाडीतील मेळाव्यात ते बोलत होते.
आमदार राणे पुढे म्हणाले, तिनं पैकी दोन आमदार शिवसेनेचे आहेत. आपल्या ताकदीला कोणी नाकारू शकत नाही. आमचे नेते युतीचा निर्णय घेतील. मित्रपक्षाची विधान बघता दोन दिवसांपूर्वी आम्ही स्वबळाचा नारा दिला. माझ्या मतदारसंघात सर्वात जास्त लक्ष आहे. त्यामुळे कितीवेळ महायुतीची चर्चा करायची ? केसरकरांच्या स्वभावाचा परिणाम माझ्यावर झालाय. मात्र, दीपक केसरकर मैदानात उतरले तर अनेकांना पत्ते बदलावे लागतात. आपली ताकद दाखवून द्यायची ही निवडणूक आहे. आपण नंबर १ आहोत ही दाखवुन द्यायची ही वेळ आहे. कुंपणावर उभं असणाऱ्यांना कधी घ्यायचं सांगा, आपला हॉल हाऊसफुल्ल होईल. फक्त, केसरकरांनी ग्रीन सिग्नल द्यावा, समोर काही शिल्लक ठेवणार नाही असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.










