
वेंगुर्ले : रेडी येथील श्री देवी माऊली चा प्रसिध्द सप्ताह उत्सवाच्या शेवटचा दिवशी कुडाळ -मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी सप्ताहाला भेट देऊन श्री देवी माऊलीचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीने आमदार निलेश राणे यांना जि.प माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते देवीची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच नमिता नागोळकर, नंदू रेडकर, भाई राणे, अण्णा गडेकर, सुनील सादजी आदी उपस्थित होते.