महायुती अभेद्य : आमदार निलेश राणे

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 08, 2025 19:39 PM
views 211  views

सिंधुदुर्गनगरी :  यापूर्वी असे घडले नाही ते या कार्यक्रमातून दिसले. शिंदे शिवसेना व भाजप ही महायुती एकत्र आहे हे भाजपच्या महिला नेत्या सुप्रियाताई वालावलकर यांनी या कार्यक्रमातून दाखविले. भावा बहिणीचे नाते त्यांनी सांभाळले त्यापेक्षा आमची महायुती अभेद्य आहे हे या कार्यक्रमातून दिसले असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी ओरोस येतील कार्यक्रमात बोलताना केले. त्यामुळे उपस्थित शिंदे शिवसेना भाजपा कार्यकर्त्यांनी त्याला चांगलीच दाद दिली. 

सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवनांमध्ये भाजप नेत्या सुप्रियाताई वालावलकर यांच्या पुढाकाराने या मतदारसंघातील वाहनचालकांना हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झाला. यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सुप्रियाताई वालावलकर, कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, सरपंच परशुराम परब, गौरव घाडीगावकर, प्रितेश परब, साक्षी कोचरेकर, नीता जुवेकर आधी उपस्थित होते.

शिंदे शिवसेना व भाजप महायुतीच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुप्रियाताईंनी केले. त्यांचे अनेक कार्यक्रम विधायक स्वरूपाचे असतात. म्हणून मी आवर्जून त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो. त्यांनी या भागातील कार्यकर्त्यांना हेल्मेट वाटप करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आपल्या कार्यकर्त्यांना भाऊ मानत त्यांनी आपल्या हस्ते केलेला हा कार्यक्रम आदर्श आहे. कार्यकर्त्यांची त्यांनी भाऊ बहिणीचे नाते जोपासले आहे याबद्दल त्यांनी सुप्रियाताईंचे कौतुक केले. प्रभाकर सावंत यांनीही त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.हेल्मेट वापरणे किती गरजेचे आहे त्याचे महत्त्व सांगितले आरटीओचे अधिकारी भगत यांनी रस्त्याचे नियम वाहतूक सुरक्षा यांचे मार्गदर्शन केले रक्षाबंधनानिमित्त त्याने सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. 

स्वामिनी महिला मंडळ आणि निसर्ग फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ओरस जिल्हा पत्रकार भवन येथे रक्षाबंधनाच्या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भगिनींनी रक्षाबंधन साजरे करत मोटारसायकल वाहनधारकांना हेल्मेटचे वाटप केले आणि रस्ते सुरक्षा जनजागृतीचा संदेश दिला. या उपक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मोटर परिवहन मंडळाचे राजन भगत, कुडाळ तालुकाप्रमुख दीपक नारकर, स्वामिनी महिला  मंडळ अध्यक्ष सौ. सुप्रिया वालाव लकर, उपसरपंच पांडू मालवणकर ग्राम पंचायत सदय श्री. गौरव घाडीगावकर राजश्री नाईक प्रिया आजगावकर भक्ती पळसांबकर अमित भोगले आणि आम्ही चारचौघी  फुगडी महिला मंडळ संजना राणे वीणा पाडाळकर घाडीगावकर, उत्कर्ष मंडळ अध्यक्ष दीपा ताटे, सर्व मंडळातील बूथ अध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.

यावेळी महिला व पुरुष दीडशे लोकांना हेल्मेट वाटप करण्यात आले. निलेश राणे यांनी मार्गदर्शन केले. असे कार्यक्रम करताना सामाजिक सलोखा आणि रस्ते सुरक्षा यांची काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले.