आमदार निलेश राणेंच्या सूचना

प्रत्यक्ष कामाला सुरवात
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 09, 2025 19:52 PM
views 381  views

मालवण : मालवण बेळणे मुख्य मार्गांवरील विरण पोईप येथील छोट्या पुलाची संरक्षक भिंत कोसळून रस्ता खचला. आमदार निलेश राणे यांनी आज पुलाची पाहणी केली. ग्रामस्थ, विद्यार्थी यांची कोणतीही गैरसोय होता नये. पुलाची संरक्षक भिंत आणि खचलेल्या भागाचे काम तात्काळ सुरु करा. अश्या सूचना बांधकाम अधिकारी यांना करत आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

दरम्यान, विरोधकांनी पुलाच्या विषयावरून गावात राजकारण करू नये. असाही टोला आमदार निलेश राणे यांनी विरोधकांना लगावला. तर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले जनतेच्या व वाहतूकीच्या दृष्टीने या पुलाची असलेली आवश्यकता लक्षात घेता आमदार निलेश राणे यांनी याठिकाणी पाहाणी करून तात्काळ काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या. जनतेच्या जे मनात तेच आमदार निलेश राणे यांच्या कार्यातून स्पष्ट होते असे दत्ता सामंत म्हणाले.

मालवण बेळणे मुख्य मार्गांवरील विरण पोईप येथील छोट्या पुलाची संरक्षक भिंत कोसळून रस्ता खचला. अवजड वाहतूकिस रस्ता बंद करण्यात आला. पाऊस व पाण्याच्या प्रवाहात रस्ता अधिक खचून मार्ग बंद होण्याची स्थिती निर्माण झाली. याबाबत माहिती मिळताच आमदार निलेश राणे यांनी सोमवारी सकाळी विरण येथे जाऊन पाहाणी केली. पुलाच्या संरक्षक भिंत आणि खचलेल्या भागाचे काम तात्काळ सुरु करा. अश्या सूचना बांधकाम अधिकारी यांना करत आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे स्पष्ट केले. दरम्यान आमदार निलेश राणे यांच्या निर्देशानुसार प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात आली आहे. 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, जिप माजी अध्यक्ष संजय पडते, जिप माजी सभापती अनिल कांदळकर, तालुकाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख विनायक बाईत, माजी सभापती सुनील घाडीगावकर, माजी सभापती राजू प्रभुदेसाई, पोईप सरपंच श्रीधर नाईक, माजी नगरसेवक दीपक पाटकर, किरण प्रभू, पंकज वर्दम, जितेंद्र परब, प्रशांत परब, कांता चव्हाण, दत्ताराम आंबेरकर, विलास पांजरी, मोहन पांजरी, दयानंद प्रभूदेसाई, गोपीनाथ पालव, विलास माधव, सचिन पालव, दाजी येरम, नारायण उर्फ पप्पू राणे, संदीप सावंत, सत्यवान पालव, अशोक पालव, महेश पालव, सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी अभियंता अजित पाटील, कनिष्ठ अभियंता पुरुषोत्तम भोये यांसह पोईप व विरण मधील शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडे या पुलाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाबाबत अनिल कांदळकर व ग्रामस्थांनी माहिती दिली. दत्ता सामंत यांनी सर्व माहिती आमदार निलेश राणे यांना दिली. लगेचच सोमवारी आमदार निलेश राणे यांनी प्रत्यक्ष पुलाची पाहणी केली. पुलाचे काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. निधी उपलब्ध व आवश्यक सर्व बाबतीत सहकार्य केले जाईल. काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने करून घ्या. ग्रामस्थांना कोणतीही अडचण गैरसोय निर्माण होता नये या दृष्टीने काम पुर्ण करा. असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

यावेळी माजी जि.प. बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनी आमदार निलेश राणे यांना संपूर्ण माहिती दिली. दरम्यान पुलाच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत माजी जि.प. बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात. आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पुलाच्या दुरुस्तीबाबत तात्काळ कार्यवाही केल्याने पोईप व विरण गावातील ग्रामस्थांनी आभार मानले.

आमदार निलेश राणे खऱ्या अर्थाने जनतेचे नेतृत्व आहेत. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नाशील असतात. मोठा विकासनिधी मतदारसंघात आणण्यात ते यशस्वी ठरले. आताही पुलाची समस्या त्यांच्या निदर्शनास येताच तातडीने काम सुरु करण्याबाबत त्यांनी घेतलेली भुमिका जनहिताची आहे. गेल्या दहा वर्षाचा विचार करता मतदारसंघात हे पहिल्यांदा होतंय. असे सांगत माजी सभापती अनिल कांदळकर यांनी आमदार निलेश राणे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.