आमदार निलेश राणेंचा पाठपुरावा आणि झटपट रिझल्ट

तीन दिवस बंद असलेली शिवापूर, वसोली आंजिवडे, दुकानवाड वाहतूक सुरू | शिवापूर पंचक्रोशी मधील लाईट - रेंज पूर्ववत
Edited by:
Published on: May 25, 2025 16:19 PM
views 64  views

माणगाव : अवकाळी पावसामुळे दुकानवाड पुलाचे काम अर्धवट राहिल्यामुळे शिवापूर, वसुली आंजिवडे दुकानवाड, साकिर्डे, अशा गावांना जाण्यासाठी असलेला मार्गच बंद झाला होता. जुना वापरता पूल पूर्ववत सुरू करून द्या. नदीतील गाळ काढून त्या पुलावरून वाहणारे पाणी बंद  करा आणि वाहतूक सुरू करून द्या. अशा स्पष्ट सूचना कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर प्रशासनाची यंत्रणा अधिक सक्रिय झाली. आणि गाळाने भरलेला हा पूल मोकळा करण्यात आला व वाहतुकीस खुला करण्यात आला.दरम्यान  या भागातील खंडित असलेला वीज पुरवठा आणि बीएसएनएलची मोबाईल रेंज सुद्धा पूर्वरत करण्यात आली. त्यामुळे शिवापूर पंचक्रोशीतील जनतेकडून  आमदार निलेश राणे यांचे आभार मानले जात आहेत. 

शिवापूर, वसुली आंजिवडे दुकानवाड, साकिर्डे, अशा गावांना जोडणारा पूल दुकानवाड येथे बांधला जात असताना पावसाच्या आगमनामुळे अर्धवट राहिला. त्यामुळे पुढे जाणारी वाहतूकच खोळंबली. जुना असलेला पापडी वजा पूल गाळाने भरला होता. त्यामुळे त्यावरून पाणी वाहत होते. तो वापरणे योग्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले  त्यामुळे आमदार  निलेश राणे यांनी  तो पूल  मोकळा करून वाहतुकीस योग्य करा अशा सूचना दिल्या आणि जुना वापरता असलेला पूल तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणच्या वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला.   दरम्यान या भागातील विजेचा ही प्रश्न सोडविण्यात आला. वीज सुरू करण्यात आली. मोबाइल  टॉवरला रेंज सुद्धा सुरू करण्यात आली आहे.