
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलली आहेत. माजी खासदार निलेश राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. कुडाळ मालवण मतदारसंघातून ते उमेदवारी दाखल करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या पक्ष प्रवेशावेळी निलेश राणे यांचे समर्थक सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष व भाजपा जिल्हाउपाध्यक्ष संजू परब आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल होणार आहेत. संजू परब यांच्यासह भाजपातील एक गट शिवसेनेत जाणार असल्याने सावंतवाडीच राजकीय गणित मात्र पालटणार आहे. यात काल रात्री शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. निलेश राणेंच्या प्रवेशानंतर जिल्ह्यासह सावंतवाडीतील शिवसेनेची ताकद वाढणार आहे. तर दुसरीकडे महायुतीतील भाजपमध्ये संजू परब यांची जागा कोण घेणार याकडे देखील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.