'शिवधनुष्य पुन्हा' ; निलेश राणेंचा सोशल मिडीयावरील फोटो बदलला

बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ शिंदे, नारायण राणे यांचे फोटो
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 22, 2024 08:52 AM
views 284  views

ब्युरो न्यूज : अखेर निलेश राणे भाजपची साथ सोडतायत. त्यांचा शिवसेना प्रवेश फायनल झालाय. स्वतः याबद्दल पत्रकार परिषद घेत याबद्दल त्यांनी माहिती दिली. CM एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे. 23 ऑक्टोबरला 4 वाजता जाहीर सभा देखील होणार आहे. 19 वर्षानंतर राणे परिवाराला सदस्य शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने याकडे साऱ्यांचं लक्ष वेधलंय. 


पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांच्या सोशल मिडीयावरील फोटोही बदललेत. FB चा कव्हर फोटो बदलण्यात आलाय. यावर 'शिवधनुष्य पुन्हा' असं लिहिण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्रही त्यावर लावण्यात आलंय. तर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतीने खासदार नारायण राणे यांचाही फोटो आहे.  


निलेश राणे काय म्हणाले ?  


भाजपात खूप प्रेम मिळालं. भाजपात काम करण्याची शिस्त शिकायला मिळाली. ती जवळून बघितली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लहान भावाप्रमाणे सांभाळल. पक्षात अडचणी आल्यात त्यातून बाहेर काढलं. रवींद्र चव्हाण यांनीही लहान भावाप्रमाणे सांभाळल. भाजपशी जीवाभावाचे संबंध आजही आहेत, कायम राहतील. राजकारणात जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हा पासून नारायण राणेंच्या सावलीमध्ये, ते बोलतील जस बोलतील काहींही प्रश्न न विचारता त्यांच्या बरोबर राहिलो. 23 ऑक्टोबरला उद्या 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही मंत्रीमंडळाच्या उपस्थितीत कुडाळ हायस्कूल ग्राउंडवर शिवसेना प्रवेश होईल. 


जेव्हा आपण अलायन्समध्ये असतो. तेव्हा अलायन्सच्या प्रोटोकोलनुसार काम कराव लागत. खासदारकी जिंकलो, ग्रामपंचायत जिंकल्या. खरेदी संघ जिंकलो. यासगळ्या निवडणुका युतीत जिंकलो. आता विधानसभा जिंकू. वरिष्ठांनी ठरवलेल्या या गोष्टी आहेत. राणे साहेबांची सुरुवात ज्या पक्षातून झाली ज्या चिन्हावर झाली त्या चिन्हा वरून मी लढणार आहे याचं मला समाधान आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आता काम करायला मिळेल.