
वेंगुर्ले : रेडीची ग्रामदेवता देवी माऊलीचा जत्रोत्सव १९ नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. यावेळी जत्रोत्सवाला कुडाळ विधानसभा आमदार नीलेश राणे यांनी भेट घेतं देवी माऊली चे दर्शन घेतले. यावेळी रेडी देवस्थानच्या वतीने सरपंच रामसिंग राणे यांच्या हस्ते आमदार निलेश राणे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी आनंद शिरवलकर ,शेखर राणे, जि प चे माजी शिक्षण आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग राणे, माऊली देवस्थान विश्वस्त संदीप राणे, माऊली देवस्थान मानकरी सुहास राणे, दीपक राणे अमोल राणे, स्वप्नील राणे, पुरुषोत्तम राणे सागर राणे, अण्णा गडेकर, शेखर वारखंडकर, शिवसेना उपविभाग प्रमुख सुनील सादजी, शाखा प्रमुख नंदकुमार राणे, रोहीत गवंडी, बाबाजी राणे, महेश खानोलकर, प्रसाद रेडकर, रोहीत भगत, ग्रामपंचायत सदस्य सागर रेडकर, आबा राणे, माऊली देवस्थान चे सर्व मानकरी, रेडी विकास मंडळ मुंबई चे सर्व पदाधिकारी आणि रेडी ग्रामस्थ उपस्थित होते.










