उबाठा गटातील नगरसेविका श्रुती वर्दम यांच्या गणरायाचं निलेश राणेंनी घेतलं दर्शन..!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 27, 2023 12:56 PM
views 323  views

कुडाळ : माजी खासदार निलेश राणे यांनी आज कुडाळ नगरपंचायत क्षेत्रातील गणरायांचे दर्शन घेतले. उबाठा गटाच्या नगरसेविका श्रुती वर्दम यांच्याही निवासस्थानी जात माजी खासदार निलेश राणे यांनी गणरायाचे दर्शन घेतले. यामुळे कुडाळ शहरासह उबाठा गटात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.