'टायगर इज बॅक' !

Edited by: विनायक गावस
Published on: October 27, 2023 09:24 AM
views 322  views

सिंधुदुर्ग :  टायगर इज बॅक' चे बॅनर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लागले असून भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांचे सिंधुदुर्गात आज स्वागत होणार आहे.

नुकतीच राजकीय संन्यास घेण्याची पोस्ट निलेश राणे यांनी केली होती.‌ त्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाशी निलेश राणेंची भेट घालून देत त्यांची नाराजी दुर केली होती. या राजकीय घडामोडीनंतर प्रथमच निलेश राणे सिंधुदुर्गात येणार असुन त्यांच आज कार्यकर्ते जिल्ह्यात स्वागत करणार आहेत.

यानिमित्ताने हायवेवर लागलेले टायगर इज बॅकचे बॅनर लक्षवेधी ठरत आहेत. निलेश राणे यांचे समर्थक आनंद शिरवलकर यांनी हे बॅनर लावले आहेत.