कुडाळ रेल्वेस्थानकाच्या सुशोभीकरण कामाच निलेश राणे यांनी केलं भूमिपूजन

Edited by: भरत केसरकर
Published on: August 08, 2023 13:43 PM
views 233  views

कुडाळ : कुडाळमधील रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणासाठी तब्बल सहा कोटींमध्ये खर्च केले जाणार आहेत. सहा कोटी खर्चून हे रेल्वेस्थानक सुसज्ज असे करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. या समारंभास कुडाळ रेल्वेस्थानकात माजी खासदार निलेश राणे उपस्थितीत होते.


यावेळी जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, संध्या तेर्से, दीप्ती पडते, आनंद शिरवलकर, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर,दीपक नारकर, बंडया सावंत, राजू राऊळ, बाबा परब, विलास कुडाळकर, प्राजक्ता शिरवलकर, धोंडी चिंदरकर, विजय केनवडेकर, महेश मांजरेकर, पप्पू तवटे, रूपेश कानडे, विनायक राणे, आदी उपस्थित होते.