निलेश राणेंनी घेतली मंत्री मंगलप्रभात लोढांची भेट | पायाभूत सुविधांसाठी निधीची केली मागणी

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 11, 2023 13:56 PM
views 267  views

मालवण : किल्ले सिंधुदुर्ग येथे पायाभूत सुविधा विकास व अन्य सुविधांसाठी २५ कोटी रुपयांची मागणी भाजप नेते निलेश राणे यांनी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे. सोबत चिंदर तलाव सुशोभीकरण ६ कोटी तर धामापूर भगवती मंदिर परिसर व तलाव सुशोभिकरणं ३ कोटी, डिगस चोरगेवाडी धरण परिसर विकास यासाठी ३ कोटी निधीची मागणी ही निलेश राणे यांनी केली आहे.

कुडाळ मालवण भाजपा विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी सोमवारी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची मुंबई येथे भेट घेत सकारात्मक चर्चा केली. काही महिन्यांपूर्वी कुडाळ तालुक्यातील १० प्रमुख धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मंगलप्रभात लोढा यांच्या अंतर्गत असलेल्या प्रादेशिक पर्यटन योजनेतून कोट्यवधींचा निधी मंजूर झाला होता. त्या नंतर आता किल्ले सिंधुदुर्ग येथे पायाभूत सुविधा विकास करणे, चिंदर तलाव सुशोभीकरण करणे, धामापूर श्री देवी भगवती मंदिर परिसर विकास करणे तसेच तलाव सुशोभीकरण करणे, डिगस चोरगेवाडी धरण येथे उद्यान विकसित करणे व पायाभूत सुविधा निर्माण करणे, या विकास कामांसाठी निधी मागणीचा प्रस्ताव निलेश राणे यांनी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांना सादर केला. त्यावर सकारात्मक चर्चा होऊन लोढा यांनी पुढील कार्यवाहीची सूचना दिली. 

किल्ले सिंधुदुर्ग येथे पायाभूत सुविधा विकास व अन्य सुविधांसाठी निलेश राणे यांनी २५ कोटी रुपयांची मागणी केली असून चिंदर तलाव सुशोभीकरण ६ कोटी तर धामापूर भगवती मंदिर परिसर व तलाव सुशोभिकरणं तसेच डिगस चोरगेवाडी धरण परिसर विकास यासाठी प्रत्येकी ३ कोटी एवढ्या निधीची मागणी निलेश राणे यांनी केली आहे.