निलेश राणेंनी केलं मोटरसायकल रॅलीचे नेतृत्व...!

Edited by: भरत केसरकर
Published on: June 10, 2023 12:30 PM
views 805  views

कुडाळ : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रातील सरकारला यशस्वीरीत्या ९ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मोदी@9 या अभियानांतर्गत मुंबई गोवा महामार्गावरील झाराप ते ओरोस अशा भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे नेतृत्व 'विकास तीर्थ' कार्यक्रमाचे लोकसभा संयोजक माजी खासदार निलेश राणे यांनी केले.

या रॅलीत माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजन तेली,युवा नेतृत्व विशाल परब,आनंद शिरवलकर,अतुल काळसेकर,रणजीत देसाई,सौ.संध्या तेर्से,अशोक सावंत,प्रभाकर सावंत,प्राजक्ता शिरवलकर,संजय वेंगुर्लेकर,भाई सावंत,विनायक राणे,दादा साईल,नगरसेवक अबी गावडे,विलास कुडाळकर,चांदणी कांबळी,रेखा काणेकर,रूपेश कानडे,राकेश कांदे यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ही रॅली झीरो पाॅईन्ट झाराप येथून सुरू झाली. तर सिंधुदुर्गनगरी येथे आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी निलेश राणेंनी मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत येईल असे आपल्या भाषणांतून स्पष्ट केल.