
मालवण : महायुतीचे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा मालवण येथे होतं आहे. शिवसेना नेते बाळा चिंदरकर यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे.
खासदार नारायण राणे यांनी अनेक मेळावे, सभा घेतल्या. शेवटचे चार दिवस जाहीर प्रचारासाठी शिल्लक राहिले आहेत. जिल्ह्यात महायुतीचे तीनही उमेदवार निवडून येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक योजना आणल्या आहेत. जिल्हा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी घडवला आहे. सिंधुदुर्गची ओळख राज्यात निर्माण झाली ती नारायण राणे यांच्यामुळेच. निलेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत. लाडकी बहीण योजनेसह अनेक योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणल्या त्या घराघरात पोहोचवा. या मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचे बाळा चिंदरकर यांनी सांगितले.