निलेश राणेंच्यावतीने खोत जूवा बेटावर चार्जिंग बल्ब वितरित

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 11, 2024 08:11 AM
views 144  views

मालवण : मसुरे खोत जूवा बेटावरील ग्रामस्थांना गणेश उत्सव काळामध्ये वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे येथील ग्रामस्थांची समस्या लक्षात घेता माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून येथील सर्व ग्रामस्थांना चार्जिंग बल्ब भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वितरित करण्यात आले. यावेळी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल खोत यांनी भारतीय जनता पक्षाचे बाबा परब, महेश मांजरेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचे लक्ष वेधले होते. येथील ग्रामस्थांची मागणी लक्षात घेता निलेश राणे यांच्या माध्यमातून येथील सर्व ग्रामस्थांना हे बल्प वितरित करण्यात आले. 

यावेळी प्रवीण खोत,  नीलकंठ खोत, मुरलीधर खोत, दीपक खोत, सुधीर खोत, संदीप खोत, प्रताप खोत,  समीर खोत, अनिल खोत आणि ग्रामस्थ उपस्थित होते. खोत जूवा बेटावरील सर्व ग्रामस्थांनी माजी खासदार निलेश राणे आणि भारतीय जनता पक्षाचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी बोलताना माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल खोत म्हणालेत की भारतीय जनता पक्ष, माजी खासदार निलेश राणे आणि त्यांचे सर्व सहकारी हे अडीअडचणीच्या प्रसंगी खोत जूवा बेटावरील सर्व ग्रामस्थांच्या मागे खंबीरपणे उभे असतात. निलेश राणे यांचे कार्य हे नेहमीच लोकाभिमुख असते.