वैभव नाईक यांना निलेश राणेंचा दिला धक्का | आंबडपाल सरपंचासह अनेक कार्यकर्ते भाजपात

Edited by: भरत केसरकर
Published on: August 10, 2023 13:50 PM
views 852  views

कुडाळ : कुडाळ -  मालवण मतदार संघात आमदार वैभव नाईक यांना माजी खासदार निलेश राणे यांनी मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आंबडपाल सरपंच महेश मेस्त्री यांनी ग्रामपंचायत सदस्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर वेताळबांबर्डे माजी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्षासह पणदुर युवा सेना शाखाप्रमुख या सर्वांनी आज भारतीय जनता पक्षात माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ भाजप कार्यालय येथे प्रवेश केला.

या प्रवेशा मुळे भाजपची ताकद कुडाळ-मालवण मतदार संघात वाढणार आहे.निलेश राणे यांचे कट्टर समर्थक असलेले भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी हे खिंडार पाडण्यास मदत केली आहे.विशाल परब,पप्पू तवटे हे आजच्या प्रवेशाचे खरे शिलेदार ठरले आहेत.या प्रवेशानंतर माजी खासदार निलेश राणेंनी आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार टिका केली आहे.

यावेळी माजी खासदार निलेश राणे,भाजप युवा नेते विशाल परब,तालुकाध्यक्ष दादा साईल,तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर,महिला जिल्हाध्यक्ष सौ.संध्या तेर्से,दिपक नारकर,माजी नगराध्यक्ष संजू परब,प्रकाश मोर्ये,दीप्ती पडते,भाई सावंत,पप्पू तवटे,आबा धडाम,राकेश कांदे,बंड्या सावंत,विलास कुडाळकर,विनायक राणे,चांदणी कांबळी यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.माजी खासदार निलेश राणे यांनी पक्षात आलेल्यांना योग्य सन्मान व आदर केले जाईल असे स्पष्ट केले.तर याभागासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही असेही स्पष्ट केले.