निलेश राणेंनी हनुमान मंदिरात केली स्वच्छता

Edited by:
Published on: January 21, 2024 07:23 AM
views 296  views

मालवण : २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार असून, त्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना आपल्या परिसरातील मंदिरे स्वच्छ करण्याचे आवाहन केले आहे. या 'स्वच्छ तीर्थ' अभियानाअंतर्गत भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी मालवण बाजारपेठ येथील हनुमान मंदिरात स्वच्छता केली. 

प्रभू श्रीराम यांच्या पवित्र मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा सोमवारी 22 जानेवारी रोजी अयोध्यानगरीत संपन्न होत आहे. सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून भाजपच्या वतीने मंदिर स्वच्छता सेवा अभियान राबविले जात आहे. मालवणातही भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत रविवारी मंदिर स्वच्छता सेवा अभियान राबविण्यात आले. बाजारपेठ मारुती मंदिर येथे निलेश राणे या अभियानात सहभागी झाले. भाजपा पदाधिकारी, व्यापारी संघाचे पदाधिकारी, जिल्हा बँक कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.