'सर्वपक्षीय निष्ठावान आमदार वैभव नाईक' | निलेश राणेंचा टोला

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 05, 2024 11:35 AM
views 402  views

मालवण : आमदार वैभव नाईक यांनी कितीही अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव यावर्षी देखील साजरा करणार. वैभव नाईक यांनीही आमच्यापेक्षा मोठा दहीहंडी उत्सव घ्यावा. जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांना कार्यक्रम पाहता येईल. असे सांगत भाजपा कुडाळ मालवण विधानसभा निलेश राणे यांनी वैभव नाईक यांचा 'सर्वपक्षीय निष्ठावान आमदार वैभव नाईक' असा टोला लगावला. 

माजी खासदार निलेश राणे यांनी एक्स अकाउंटवर आमदार वैभव नाईक यांना आव्हान दिले आहे. त्यांनी म्हटले आहे, कितीही प्रयत्न सर्वपक्षीय निष्ठावान आमदार वैभव नाईक यांनी आमच्या दहीहंडी उत्सवाला अडचण निर्माण करण्याचे केले तरीदेखील आम्ही मोठ्या उत्साहाने दहीहंडी उत्सव यावर्षी देखील साजरा करणार. माझी विनंती आहे वैभव नाईक यांना की त्यांनी आमच्यापेक्षा मोठा दहीहंडी उत्सव घेऊन दाखवावा जेणेकरून ग्रामीण भागातल्या लोकांना चांगला कार्यक्रम बघायला मिळेल. 

मागच्या १० वर्षामुळे कुडाळ मालवणच्या लोकांना अठराव्या शतकातलं जीवन जगावं लागत आहे, त्यांना त्यातून बाहेर काढावं हा आमचा प्रयत्न आहे. त्याला हातभार सर्वपक्षीय निष्ठावान आमदार वैभव नाईक यांनीही लावावा असा आमचा त्यांना आग्रह आहे. असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.