प्रवेशकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : निलेश राणे

Edited by: भरत केसरकर
Published on: October 18, 2023 20:20 PM
views 94  views

कुडाळ : तुम्ही ज्या विश्वासाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही असे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी झाराप येथे सांगितले. झाराप ग्रामपंचायतीचे सरपंच दक्षता मेस्त्री, उपसरपंच मंगेश परब, ग्रामपंचायत सदस्य अनंत मयेकर यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेतून भाजपमध्ये कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करून उबाठा सेनेला धक्का दिला.


ग्रामपंचायत च्या सरपंच उपसरपंच व सदस्य तसेच ग्रामस्थांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशावेळी प्रदेश सदस्य दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, चिटणीस विनायक राणे, माजी नगरसेवक पाटकर, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, खरेदी विक्री संघ अध्यक्ष दीपक नारकर, माजी सभापती मोहन सावंत, माजी पंचायत समिती सदस्य स्वप्ना वारंग, पप्या तवटे, नगरसेवक अभी गावडे, रूपेश बिडये आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश कानडे यांनी केले.


यावेळी अमोल तेली, विद्या जाधव, भगवान परब, प्रगती घाडी, सुप्रिया मांजरेकर, सर्वेश मांजरेकर, संजय मांजरेकर, विश्राम घाडी, दशरथ मेस्त्री, हर्षदा मेस्त्री, विजया मेस्त्री, हनुमंत मेस्त्री, विलास मेस्त्री, उत्तम मेस्त्री, साक्षी तेली, जान्हवी गावकर, सविता ठाकूर, चैताली कुडाळकर, प्रीती तेली, अश्विनी तेली, माधवी मयेकर, नितीन पाटकर, ऋतिक मुंडये, दादा कलंगुटकर, निधी पाटकर, विठोबा गावकर, प्रमोद मेस्त्री, परेश हळदणकर, सुरेश शिरोडकर, सुधाकर मयेकर, महिमा हळदणकर, रत्नभागा मयेकर, महादेवी मयेकर, जतिन मयेकर, दत्ता आळवे, तुषार नारूरकर, रमजान भालेकर, शिल्पा माणगावकर, स्नेहल माणगावकर, सत्यवान माणगावकर, सुभाष माणगावकर, महेश गोडे, मनश्री शिरोडकर, भारती गवळी, सुलोचना घाडी, रुपावती घाडी, चैताली कुडाळकर, अश्विनी तेली, सुचित्रा सामंत, सुधीर हळदणकर, निलेश तुळसकर, प्रवीण रेडकर, अनामिका घाडीगांवकर, मधुकर शिरोडकर, गुरू गवळी यांनी प्रवेश केला.


यावेळी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी सांगितले की, गावाचा विकास करायचा असेल तर भाजपला साथ देणे गरजेचे आहे. तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्य आहे. आता तुम्हाला जे मिळवून द्यायचे आहे ते आम्ही देवू आता गावाच्या विकासाची जबाबदारी आमची आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.