
मालवण : सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे असं ट्विट करून माजी खासदार निलेश राणे यांनी राजकारणात खळबळ उडवून दिलेली आहे. त्यांच्या या ट्विट नंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. दत्ता सामंत म्हणाले, आताच निलेश राणे साहेबांचं ट्विट वाचल निलेश राणे साहेबानी हा निर्णय मागे घ्यावा .2024 मध्ये कुडाळ मालवण मधुन आमदार हे निलेश राणेसाहेबच असतील आणी निलेश राणे साहेबांना आम्ही निवडणून आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तसेच आम्ही तेंच्या पाठीशी खंबिर् पणे उभे राहू. निलेश राणे आपला निर्णय नक्की मागे घेतील अशा विश्वास आहे आणी तो त्यांनी घ्यावा . हा माझा आग्रह राहणार आहे










