निलेश राणेंचा तडकाफडकी निर्णय

दोन नगरसेवकांचे राजीनामे
Edited by: विनायक गांवस
Published on: October 24, 2023 13:52 PM
views 2488  views

सिंधुदुर्ग : कोकणाच्या राजकीय पटलावरुन मोठी बातमी समोर येत आहे. माजी खासदार आणि विद्यमान केद्रीय मंत्री नारायण यांचे पुत्र निलेश राणे यांनी राजकारणातून सन्यांस घेण्याचा निर्णय घेतला आहे. निलेश राणे यांनी दसऱ्याच्या मूहूर्तावर एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरती याबाबत घोषणा केली आहे.


"मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या 19/20 वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे."


"BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे. मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन." निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही."


"कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!"


दरम्यान, सिंधुदुर्गतून माजी खासदार नितेश राणे यांचे काही कार्यकर्ते निलेश राणेंना भेटण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. तर कुडाळ नगरपंचायत मधील दोन नगरसेवकांचा राजीनामा दिलेत.