
सिंधुदुर्गनगरी : संघटनात्मक आणि विकासत्मक काम करून राज्यात कुडाळ - मालवण मतदार संघ आदर्श बनवायचा आहे. गावातील विविध रस्ते, पाणी ,वीज या विकास कामांबरोबर रोजगार निर्मिती करून गेल्या दहा वर्षातील बॅक लॉक पूर्ण भरून काढू, शिवसेना संघटनेची दर्जेदार बांधणी करून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जिंकायच्या आहेत. कुडाळ मालवण मतदार संघ राज्यात आदर्श मतदारसंघ मॉडेल बनविण्याच्या दृष्टीने काम करूया. असे आव्हानात्मक प्रतिपादन शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी केले.
ओरोस येथील गोविंद सुपर मार्केट संकुल येथे आमदार निलेश राणे यांच्या संपर्क कार्यालयात वालावल ,कडावल आणि मालवण ग्रामीण रुग्णालयासाठी शव पेट्या ,ओरोस ग्रामपंचायतीला कचरा घंटागाडी तसेच वेताळबांबर्डे कदमवाडी शाळेला संगणक वितरण कार्यक्रम आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला . यावेळी प्रिमायल चारीटेबल ट्रस्टचे प्रमुख मरबाल हिल मुंबई शाखा प्रमुख विजय घरत, माजी जि प अध्यक्ष संजय पडते, दीपलक्ष्मी पडते, दादा साईल, देवेद्र सामंत, ओरोस सरपंच आशा मुरमुरे, उपसरपंच पांडू मालणकर, सुप्रिया वालावलकर, रानबांबुळी सरपंच परशुराम परब आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार निलेश राणे म्हणाले प्रिमायल चॅरीटेबल ट्रस्टचे विजय घरत यांनी आता पर्यंत कोकण विभागात दहा शवपेट्या आणि औषधांचा पुरवठा केला आहे. त्यांचे शवपेट्या देणे किवा औषध देणे एवढेच काम नाही. मुंबईत त्यांनी उतम समाज कार्य केले आहे. आणि ते अविरत सुरू आहे. विजय घरत सारखी अनेक मानसे आहेत कोकणातअनेक तालुक्यात त्यांनी शवपेट्या, संगणक दिले .
संजय पडते यांचे व माझ नाते कधीच तुटल नाही. आता ते माझ्या पक्षात आले आहेत, त्याचा शिवसेनेला फायदा होईल. या मतदारसंघासाठी संघटनात्मक काम करता येईल ते करू. आपल्या मतदार संघाचा विवीध विभागाचा आढावा घेता, जिल्हा नियोजनचा आराखडा सातशे कोटीपर्यत जाईल.आता प्रस्ताव केला आहे त्यामध्ये नविन रस्ते, ब्रिज ,यासह विविध कामे घेण्यात आली आहेत.
राज्य नियोजनने ३०८ कोटी चा आराखडा मंजूर केला आहे. त्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचे यावेळी अभिनंदन केले. आता आपण सर्वानी आपल्या गावाच्या आणि मतदार संघाच्या विकासाच्या दृष्टीने दर्जेदार काम करा. असे प्रतिपादन यावेळी निलेश राणे यांनी केले.
यावेळी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते वेताळ बाबर्डे कदमवाडी शाळेला संगणक, कडावल ,वालावल आणि मालवण ग्रामीण रुग्णालय येथे शवपेटी देण्यात आल्या.