
मालवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा यात्रोत्सव २२ फेब्रुवारी २०२५ ला सुरू होत अशी. लाखो भाविक दर्शनाकरिता आंगणेवाडीला येत असतात. त्या पार्श्वभूमीवर आज कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाकडून आमदार निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.
यात्रे निमित्त भाविकांची कोणतीही गौरसोय होऊ नये. यासाठी आमदार निलेश राणे यांनी येथील सोयीसुविधा, सुरक्षा यंत्रणेची पाहणी करत मंदिर समितीच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. तसेच सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.