
सावंतवाडी : कणकवली येथील अध्यापक विद्यालयाचे लिपिक निलेश पारकर यांचा नुकताच त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग (डाएट) यांच्या तर्फे मान्य वरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
निलेश पारकर हे अध्यापक विद्यालय कणकवली येथे कार्यरत आहेत. २००६ पासून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, आयोजित डी.एल.एड.(डी.एड) परीक्षा केंद्रावर ते लिपिक म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली आहे
गेल्या सतरा वर्षांत चौतीस परीक्षेचे कामकाज बिनचूक केले आहे.परीक्षा कामकाजाची पोचपावती त्यांना या सन्मानातून प्राप्त झाली आहे.डाएटचे प्राचार्य सुशील शिवलकर, परीक्षा विभाग प्रमुख बी.एस.कांबळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. निलेश पारकर हे जिल्ह्यातील विविध संस्थांतून कार्यरत आहेत. या निमित्ताने त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे.
या कार्यात सर्वांचं सहकार्य लाभले आहे. या सत्कारातून भविष्यात त्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे