महिलांनो, राणेंच्या मागे उभ्या रहा !

विरोधी खासदारांच डोळ्याला दिसणार एकतरी काम दाखवा : सौ. निलम राणे
Edited by: विनायक गावस
Published on: May 02, 2024 13:25 PM
views 99  views

सावंतवाडी : नारायण राणेंना निवडून दिल्यास आगामी पाच वर्षांत कोकणातील महिलांसाठी मोठ्या प्रमाणात विकासात्मक काम करता येणार आहे. तुमच्या मतावर कोकणचा विकास अवलंबून आहे. समोरच्या उमेदवारांवर मला टीका करायची नाही. पण, दहा वर्षांत समोरील उमेदवारान डोळ्यांना दिसेल असं एकतरी काम दाखवाव. त्यामुळे विकास करणाऱ्या नारायण राणेंच्या मागे उभ्या रहा, त्यांना बहुमतान विजयी करा असं आवाहन सौ.‌ निलम राणे यांनी केलं. सावंतवाडी येथील आयोजित महिला शिवसैनिकांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, तुम्ही सगळीच आमची माणसं आहेत. नारायण राणे शिवसेनेतूच पुढे आले‌. आजही त्यांच प्रेम स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आहे. त्यामुळे शिवसैनिक हे आमचेच असल्याची भावना माझ्या मनात आहे. लोकसभेची निवडणूक पहिल्यांदा नारायण राणे लढवत आहे. पहिल्यांदाच त्यांना मतदान करण्याचा योग आपल्याला आला आहे. विकासाचा ध्यास घेऊन गेली ३५ वर्ष ते कार्यरत आहेत. कोकण सोडून कोणत्या दुसऱ्या गोष्टींचा त्यांना विचार केला नाही. नगरसेवक ते केंद्रीय मंत्री या वाटचालीत कोकणी माणसाच योगदान असल्याच ते आवर्जून सांगतात. 

बचत गटांच्या माध्यमातून मी महिलांसाठी कार्यरत असते. घरात तीन राजकारणी असल्यानं चौथा नसावा म्हणून मी त्यात नाही. आजवर नारायण राणेंच्या पाठीशी कोकणी माणूस नेहमी राहीला आहे. यापुढेही तो राहील असा विश्वास आहे. माझ्यापरीने बचत गट, महिलांसाठी मी कार्यरत आहे. महिलांची दुःख समजून घेऊन त्याच निराकारण करते. आज नारायण राणेंना निवडून दिल्यास आगामी पाच वर्षांत कोकणातील महिलांसाठी मोठ्या प्रमाणात विकासात्मक काम करता येणार आहे. तुमच्या मतावर कोकणचा विकास अवलंबून आहे. समोरच्या उमेदवारांवर मला टीका करायची नाही. पण, दहा वर्षांत समोरील उमेदवारान डोळ्यांना दिसेल असं एकतरी काम दाखवाव. त्यामुळे विकास करणाऱ्या नारायण राणेंच्या मागे उभ्या रहा, त्यांना बहुमतान विजयी करा असं सौ. निलम राणे यांनी आवाहन केलं. याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अँड. निता सावंत, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर,राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, अनारोजीन लोबो,  संध्या तेरसे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.