नाईक जिम अँड फिटनेस सेंटरचे आ. केसरकरांच्या हस्ते शुभारंभ

Edited by: दिपेश परब
Published on: August 21, 2025 17:26 PM
views 129  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला येथे वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेत दुसऱ्या मजल्यावर नव्याने साकारण्यात आलेल्या नाईक जिम अँड फिटनेस सेंटरचे उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते १८ ऑगस्ट रोजी करण्यात आले. 

यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शहरप्रमुख उमेश येरम, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, भाजप माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, व्यापारी सोमनाथ टोमके, माजी नगरसेवक प्रकाश नाईक, बांधकाम व्यावसायिक अखिल आरोसकर, कर सल्लागार कुणाल नाईक, आदित्य हळदणकर, शिवप्रसाद केरकर, पीटर डिसोझा, अमित नाईक, श्वेता आरोसकर, राखी दाभोलकर,  वृंदा गवंडळकर, राधिका सकपाळ, प्रणाली अंधारी, दीपाली ठोंबरे, आकांक्षा परब आणि समस्त नाईक जिम अँड फिटनेस सेंटर सदस्य आदी उपस्थित होते.