
सावंतवाडी : आत्ताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास पॅनेलचे लक्ष्मण निगुडकर यांनी चांगल यश प्राप्त केलंय. काही महिन्यांपूर्वी ते शासकीय सेवेतून निवृत्त झाले होते. प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती.
निवृत्तीनंतर राजकारणात येऊन समाजसेवा करायचा त्यांचा मानस असून, सरपंचपदाच्या पाहिल्याच प्रयत्नात त्यांना चांगलं यश मिळालं आहे. ग्रामस्थांनीही त्यांना चांगलं सहकार्य करत निवडणून दिलं.
आपल्या सरपंचपदाचा उपयोग गावच्या विकासासाठी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय.