निगुडे माऊली मंदिरात नवरात्रोत्सवात भरगच्च कार्यक्रम..!

Edited by:
Published on: October 17, 2023 17:27 PM
views 294  views

सावंतवाडी : निगुडे येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्र उत्सव निमित्त भरगच्च सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिली आहे. रविवार दिनांक १५ ऑक्टोंबर रोजी सकाळी घटस्थापना झाली. सायंकाळी ०७:०० वा. महिला फुगडी कार्यक्रम उगवे- गोवा, रात्री ०८:००   वाजता हरिपाठ इन्सुली, पुरस्कृत प्रकाश देसाई, सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०७:०० वा. श्री देवी माऊली प्रसादिक भजन मंडळ, मडुरा रात्री ०८:०० वाजता तळकर महिला दांडिया ग्रुप, तळवडे पुरस्कृत श्री देवी माऊली नवरात्र उत्सव समिती, रात्री ०९:००  वाजता स्थानिकांची भजने, मंगळवार दिनांक १७ ऑक्टोंबर रात्री ०८:०० वाजता निगुडे गावठाणवाडी महिला फुगडी, रात्री ०९:०० वाजता डॉ. टि.के.गावडे पुरस्कृत श्री देवी माउली दशावतार नाट्य मंडळ, इन्सुली यांचा नाट्यप्रयोग होईल.

बुधवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी श्री देवी सातेरी महिला फुगडी मंडळ अणसुर, वेंगुर्ला पुरस्कृत नवरात्री गावडे परिवार, रात्री ०९:०० वाजता ग्लोविंग स्टार दांडिया ग्रुप आरोंदा पुरस्कृत निगुडे तेलवाडी मित्र मंडळ, गुरुवार दिनांक १९ ऑक्टोबर श्री विघ्नहर्ता रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ निगुडे पुरस्कृत निगुडे- राणेवाडी दूरेवाडी ग्रामस्थ, शुक्रवार दिनांक २० ऑक्टोबर सायंकाळी ०७:०० वाजता महिलांचे महाआरती रात्री ०८:०० वाजता  सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी रात्री ०८:०० वाजता बुवा अमित तांबोळकर यांचे भजन पुरस्कृत लक्ष्मण गंगाराम निगुडकर, सरपंच रविवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी रात्री ०९:०० वाजता जादूगार केतन कुमार यांचा बहारदार जादूचे प्रयोग पुरस्कृत निगुडे जुनी देऊळवाडी मित्र मंडळ, सोमवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०७ वाजता स्वतः मालक बाबी कलिंगण प्रस्तुत श्री देव कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचा दणदणीत नाट्यप्रयोग पुरस्कृत श्री देव गावठाणकर कलाक्रीडा मंडळ निगुडे गावठणकर, दररोज दुपारी ०१:०० वाजता महाआरती व महाप्रसाद होईल.

भाविकांनी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली नवरात्रउत्सव समिती निगुडे तर्फे करण्यात आलेले आहे.