
देवगड : देवगड तळवडे येथील प्रसिद्ध असलेल्या न्हावणकोंड या धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूची दरड कोसळल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच अजूनही दरडीचा काही भाग कोसळण्याची संभावना असल्यामुळे या ठिकाणी काळजी घेण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन होमगार्ड देखील या रस्त्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.
या ठिकाणी कोसळलेली दरड देवगड येथील ओमटेक असोसिएट आणि तळवडे सरपंच गोपाळ रुमडे यांनी दाखवलेली तत्परते मुळे ही दरड रस्त्यावरून बाजूला हटविण्यात आली असूनअपघात होऊ नये यासाठी सध्या तरी हा रस्ता मोठ्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच गेल्या वर्षी देखील या ठिकाणी दरड कोसळली होती. त्यामुळे नागरिकांनी या दरर्डीच्या ठिकाणच्या धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावर जाळी लावण्याची मागणी केली आहे. जेणेकरून भविष्यात अपघात घडणार नाही.