न्हावेलीत ११ मे ला विविध कार्यक्रम !

Edited by: विनायक गांवस
Published on: May 10, 2024 07:45 AM
views 299  views

सावंतवाडी : श्री देवी माऊली युवक कला क्रिडा सेवा मंडळ, न्हावेली चौकेकरवाडी आयोजित माऊली रंगमंचावर शनिवार ११ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार ११ मे रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७ वाजता गुरुकुल संगीत शिक्षण संस्था,न्हावेली यांचा संगीत संध्या कार्यक्रम,रात्री ९ वाजता सप्तरंग कलामंच होडावडा यांचा ट्रिकसिनयुक्त संगीत दोन अंकी नाटक “ ब्रम्हांडनायक “ हा नाट्यप्रयोग होणार आहे.लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.