Monsoon Update | सिंधुदुर्गसाठी पुढचे 3 ते 4 तास महत्वाचे

Edited by: देवयानी वरसकर
Published on: May 30, 2023 17:01 PM
views 203  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 3 ते 4 तासांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति ताशी वेगाचा सोसाट्याचा वारा, विजांचा लखलखाट व मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. घराबाहेर पडताना काळजी घ्यावी अस आवाहन ग्रामीण कृषी मौसम सेवा, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदेचे प्रमुख यांनी केलंय. 

सदर मेघगर्जनेसह पाऊस सह्याद्री घाट माथ्याकडून सुरुवात होण्याची शक्यता आहे. विजांच्या लखलखाटाचा अंदाज घेण्यासाठी हवामान खात्याद्वारे निर्मित दामिनी ऍपचा वापर करावा, अशी माहिती ग्रामीण कृषी मौसम सेवा, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदेचे प्रमुख यांनी दिलीय.