सोन्यासारखी माणस, निगुडेतील दोन्ही युवकांचं पोलिसांकडून कौतुक

'कोकणसाद LIVE' ने दिलेली बातमी
Edited by: भगवान शेलटे
Published on: December 26, 2023 11:46 AM
views 205  views

सावंतवाडी : बांदा परिसरात प्रवास करणाऱ्या निगुडे गावातील गुरुदास निगुडकर आणि हृषीकेश निगुडकर यांना एक मौल्यवान सोन्याचा दागिना सापडला होता. हि बाब त्यांनी तात्काळ कोकणसाद LIVE शी संपर्क साधून कळवली होती. कोकणसाद LIVE च्या माध्यमातून त्याची बातमीही प्रसारित केली होती. दरम्यायन, कोकणसादची बातमी बघून ज्या व्यक्तीची वस्तू हरवली होती त्या व्यक्तीने गुरुदास निगुडकर यांना संपर्क करून वस्तू आपली असल्याच सांगितल. तसच वस्तू हरवल्याची तक्रार सावंतवाडी पोलिसात केली असल्याची माहिती दिली. त्या व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर निगुडकर यांनी ती वस्तू सावंतवाडी पोलिसांकडे सुपूर्द केली. गुरूदास निगुडकर आणि ऋषिकेश निगुडकर या निगुडे गावातील दोन तरुणांच्या प्रामाणिकपणामुळे सोन्याची मौल्यवान वस्तू तळवडे येथील मूळ मालकाला मिळण्यास मदत झाली. दरम्यान, या दोन्ही तरुणांचा सावंतवाडी पोलिसांनी सन्मान केला. यासाठी हवालदार प्रविण वालावलकर यांनी त्यांना सहकार्य केले. यावेळी पोलिस निरिक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी त्या दोघा युवकांचे कौतुकही केले. यावेळी मनसेचे गुरुदास गवंडे, डुमिंग डिसोजा उपस्थित होते.