नांदगाव वैश्य समाजाच्या स्नेह मेळाव्यात नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा गौरव

माजी आमदार राजन तेली, संदेश पारकर यांची उपस्थिती
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 01, 2023 13:40 PM
views 671  views

कणकवली : नांदगाव वैश्य समाज नांदगाव यांच्या वतीने सह कुटुंब स्नेह मेळावा व नांदगाव ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच , उपसरपंच व सदस्यांचा गौरव सोहळा नांदगाव येथील रवळनाथ मंदिर येथे उत्साहात संपन्न झाला आहे.

          यावेळी माजी आमदार राजन तेली, पर्यटन विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर , सिंधुदुर्ग गुरु समिती चे जिल्हाध्यक्ष अँड .दिपक अंधारी, कणकवली तालुका वैश्य समाजाचे अध्यक्ष दादा कुडतरकर, माजी नगराध्यक्षा सौ मेघा गांगण, गुरू काशी मठातील कमिटी विश्वस्त नागेश मोरये, नांदगाव नवनिर्वाचित सरपंच रविराज ऊर्फ भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर,नांदगाव चे माजी सरपंच पंढरीनाथ पारकर, शशिकांत शेटये, यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला आहे.

           यावेळी नवनिर्वाचित सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर व सर्व सदस्यांचा सत्कार शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे.तसेच आलेल्या मान्यवरांचा ही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.

           माजी आमदार राजन तेली बोलताना म्हणाले की, नांदगाव वर्ष समाज बांधवांचे कौतुक करीत नांदगाव ग्रामपंचायत सरपंच निवडी वैश्य समाजाबरोबरच इतर समाजाची ही मते मिळालेली आहेत. सरपंच हा संपूर्ण गावाचा असून सर्वांगीण गावच्या विकासासाठी यापुढे त्यांनी प्रयत्न करावेत. यासाठी आमची किंवा केंद्रीय मंत्री नारायण राव राणे, आमदार नितेश राणे यांच्या मदतीने तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने भरघोस निधी देण्याची ग्वाही यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी दिली आहे.

        यावेळी कोकण पर्यटन विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर बोलताना म्हणाले की नांदगाव वैश्य समाज बांधवांनी स्वामींच्या चातुर्मास कार्यक्रम तसेच पदयात्रा सोहळा या निमित्ताने समाजाची एकजूट दाखवली होती. आणि यातून हा कार्यक्रम यशस्वीपणे होत आहे अशीच एकजूट कायम ठेवावी असे आवाहन त्यांनी करत वैश्य समाज बांधवांनी आपल्या व्यवसायात यशस्वी भरारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

 यावेळी अँड दिपक अंधारी, दादा कुडतरकर, नवनिर्वाचित सरपंच रविराज मोरजकर,माजी सरपंच शशिकांत शेटये, यांनी मनोगत व्यक्त केले आहे.कार्यक्रम सुत्रसंचालन ऋषिकेश मोरजकर तर आभार माजी उपसरपंच निरज मोरये यांनी मानले.