
सिंधुदुर्ग : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमधील निवडून आलेलेे रानबांबूळी गावचे सरपंच परशुराम परब तसेच ओरोस ग्रामपंचायतीच्या सरपंच आशाताई मुरमुरे यांचा सत्कार जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाई सावंत, संतोष वालावकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत,पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर, रानबांळीचे माजी सरपंच संजय लाड गजानन मुरमुरे, सुभाष परब आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
रानबांबुळी व ओरोस गावच्या विकासाबाबत उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी नवनिर्वाचित सरंपच यांच्या बरोबर सविस्तर चर्चा केली व या दोन गावांचा विकास, गावातील असलेले प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन अतुल काळसेकर यांनी दोन्ही नवनिर्वाचित सरपंचांना यावेळी दिले.