
सावंतवाडी : कोकण शिक्षक मतदार संघ निवडणुकीत श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवून शिक्षक आमदार झाल्याबद्दल कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी राज्य सरचिटणीस श्री. आकाश तांबे यांनी श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या रूपाने शिक्षकांमधला शिक्षक आमदार झाला याबद्दल आनंद व्यक्त करून निवडणुकीच्या निकालानंतर तिसऱ्याच दिवशी ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आणि त्यांनी आपले कार्यकर्त्यांन वरील प्रेम दाखवून दिले. श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर हे शिक्षकाच्या चळवळीमधून पुढे आलेले नेतृत्व असल्या कारणामुळे यावेळीस आमच्या संघटनेने पक्षीय भूमिका न घेता श्री. म्हात्रे सर यांना जाहीर पाठिंबा दिला . सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारे असं नेतृत्व आमदारकीच्या रूपाने कोकण विभागाला मिळालेले आहे. भविष्यकाळात ते आपल्या कार्यप्रणाली द्वारे शिक्षक आमदार म्हणून राज्यामध्ये आपला ठसा उमटवून दाखवतील असा विश्वास आकाश तांबे यांनी व्यक्त केला.
या सत्कार प्रसंगी शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असून जिल्ह्यामध्ये दर दोन महिन्यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक सिंधुदुर्ग यांच्याशी बैठका घेतल्या जातील सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांचा थकीत वेतनाचा प्रश्न हा गंभीर आहे याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. शासनाकडे निधीची कमतरता थकित वेतनाची बिले संचालक कार्यालयात त्वरित पाठवावी. मी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिलेली आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आहेत ते तात्काळ मार्गी लागले गेले पाहिजेत यापुढे दप्तर दिरंगाई चालणार नाही . शिक्षकांनी सुद्धा नियमात बसणाऱ्याच गोष्टी आपल्याला सांगावेत शासनाच्या नियमात न बसणाऱ्या गोष्टीसाठी आग्रह करू नये. शिक्षकांची भरती आणि जुना पेन्शनचा विषय हा कालबद्ध पद्धतीने सोडवण्यात येईल त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल पण जुन्या पेन्शनचा प्रश्न हा आपणच मार्ग मार्गी लावू असा विश्वास श्री.म्हात्रे सर यांनी दिला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कणकवली या ठिकाणी शिक्षक आमदारांचे संपर्क कार्यालय काही दिवसांमध्ये सुरू करण्यात येईल या कार्यालयामध्ये जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी यावे आपले काही प्रश्न असतील तर त्या कार्यालयामध्ये द्यावेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिक्षक मतदार यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे तो सार्थकी लावला जाईल.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस आकाश तांबे , ज्ञानेश्वर कुंबरे भीमराव येडगे माणिक वंजारी( देवगड ) नागेश कदम ( मालवण) शेष कुमार नाईक (कुडाळ), मारुती कांबळे (सावंतवाडी) इत्यादी शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे सर तसेच मुख्याध्यापक संघाचे अन्य पदाधिकारी शिक्षक परिषदेचे सचिव सलीम तकीलदार, टीडीएफचे गुरुनाथ पेडणेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.