उसपमधील विद्यार्थ्यांना नवी छत्री, वह्या आणि बरच

जय भवानी युवा प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम
Edited by: संदीप देसाई
Published on: July 29, 2023 21:26 PM
views 84  views

दोडामार्ग : उसप येथील जय भवानी युवा प्रतिष्ठानच्या सौजन्याने श्री. शांतादुर्गा विद्यामंदिर उसप (मराठी शाळा ) व बापूसाहेब देसाई विद्यालय उसप  (हायस्कूल ) या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, छत्र्या, परीक्षा पॅड व बिस्कीटचे नुकतेच मोफत वाटप करण्यात आले.

       त्यावेळी उसप गावचे  माजी सरपंच व जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश स. गवस, सरपंच सौ. रुचिता प्रवीण गवस, धनंजय गवस, मोहन गवस, करुणा गवस, विनिता मोरजकर, शिवा गवस, नारायण गवस, चंद्रकांत नाईक, संतोष ग. गवस, अमित गवस, सचिन गवस, चंद्रकांत कळणेकर आदी उपस्थित होते. यावेळी मुलांना नवी छत्री, वह्या व परीक्षा पॅड मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद होता. उसप येथील जय भवानी युवा प्रतिष्ठान सातत्याने सामाजिक उपक्रम राबवित असते. यावेळी आपल्या गावच्या शाळकरी मुलासाठी असा उपक्रम राबवून शालेय मुलांची व त्यांच्या पालकांची मने जिंकली आहेत.