
दोडामार्ग : नुकत्याच झालेल्या शालांत परीक्षेत नूतन विद्यालय कळणे विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. नूतन विद्यालय कळणे या विद्यालयातून एकूण २३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यामध्ये प्रथम क्रमांक अविनाश यशवंत भुजबळ ९३.८० टक्के, द्वितीय क्रमांक तनिष्का विजय दळवी 92.60 टक्के, तर तृतीय क्रमांक अवनी अनंत धुपकर ८८.४० टक्के गुण मिळाले. यात प्रथम श्रेणी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कळणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कळणे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मोहनराव देसाई, शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र देसाई. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालकांनी अभिनंदन केले.