
कणकवली : महिलांचे उज्वल भविष्य घडावे यासाठी नेहमी कार्यरत असणाऱ्या न्यू खुशबू स्वयं सहायता महिला समूह नेहमीच कार्यरत असतो व महिलांच्या हाताला काम देत त्यांना स्वावलंबी बनवणाऱ्या आणि मसाला निर्मितीच्या क्षेत्रात आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या कणकवली तालुक्यातील कलमठ येथील उद्योजिका तनवीर मुदस्सरनझर शिरगावकर यांच्या न्यू खुशबू स्वयंसहायता महिला समूहाच्या महितीपटाला महाराष्ट्र राज्य चित्रपट आणि लघुपट स्पर्धेमध्ये तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. नवी मुंबई येथे झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हे पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तनवीर शिरगावकर यांनी समूहाच्या वतीने या परितोषिकाचा स्वीकार केला.