
सावंतवाडी : माजगाव ग्राम देवस्थान निधी समितीच्या अध्यक्षपदी आनंद अर्जुन सावंत, उपाध्यक्षपदी सूर्यकांत राजाराम सावंत यांची फेरनिवड तर सचिवपदी जयंत कानसे यांची निवड करण्यात आली आहे. माजगाव सातेरी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या देवस्थान कमिटी मानकरी आणि ग्रामस्थ यांच्या बैठकीत एकमताने या नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे.
यावेळी देवस्थान कमिटीचे मावळते सचिव विजय माधव यांनी कमिटीच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी देवस्थान कमिटीच्या अध्यक्षपदी फेर निवड झालेले आनंद सावंत यांनी सातेरीची मनोभावे सेवा करण्यासह सातेरी मंदिराचा धार्मिक दृष्ट्या विकास आणि भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी जेष्ठ मानकरी प्रभाकर महादेव सावंत यांनी देवस्थान कमिटीच्या कार्याचे कौतुक केले. या कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून वैभव शरद चौगुले, रामदास भगवान भोगण, महादेव भगवान घाडी, रघुनाथ अनंत कासार शिवराम काशिनाथ नाटेकर, रामा गोविंद जाधव यांची निवड करण्यात आली आहे.