संजय गांधी निराधार अनुदान समितीच्या बैठकीत नवीन १०१ प्रस्तावांना मंजुरी...!

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 09, 2023 16:44 PM
views 178  views

मालवण : संजय गांधी निराधार अनुदान समितीच्या बैठकीत नवीन 101 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यापुढेही जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना या योजनांचा लाभ देण्यात येईल अशी माहिती समिती अध्यक्ष महेश मांजरेकर यांनी दिली. 

संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक समिती अध्यक्ष महेश मांजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली मालवण तहसील कार्यालयात पार पडली. यावेळी समिती सदस्य श्रीमती. माधुरी मसुरकर, राजन माणगावकर,  राजेंद्र आंबेरकर, मधुकर चव्हाण, शासकीय प्रतिनिधी गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, नायब तहसीलदार जी एन कोकरे आदी उपस्थित होते. या सभेत 101 प्रस्ताव ठेवण्यात आले होते. या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.