नेरूर आयडीयल स्कूलमध्ये रानभाज्या - पाककला स्पर्धा

Edited by: ब्युरो
Published on: July 05, 2024 07:18 AM
views 348  views

कुडाळ  : आयडीयल इंग्लिश मिडीयम इको स्कूल नेरूर येथे 2 जुलै 2024 ला रानभाजी प्रदर्शन व पाक - कला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध प्रकारच्या 60 रानभाज्या या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. महिला पालकांनी पाक - कला स्पर्धेत उत्साहाने भाग घेऊन उत्कृष्ट व चवदार पाक - कृती बनवून उपस्थित सर्व मान्यवर व परीक्षक यांची माने जिंकली.

विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे महत्व समजावे, रानभाज्यांचा आहारात कसा वापर करावा यासाठीच हे प्रदर्शन आयोजित केले होते. या  कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय लेखिका केटी बागली, विजया चक्रवर्ती, सोफिया कॉलेज च्या माजी उपप्राचार्य डॉ मेधा राजाध्यक्ष, टाटा उद्योग समूहाचे कायदेशीर सल्लागार अनंत नेरुरकर,  आरती नेरुरकर,  नेरूर समृद्धी प्रतिष्ठान या संस्थेच्या चेअरमन डॉ नंदिनी नेरुरकर - देशमुख, सचिव डॉ व्यंकटेश भंडारी, शाळेचे मुख्याध्यापक  सौरभ पाटकर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण केटी बागली, विजया चक्रवर्ती व रानभाज्या अभ्यासक  राजा शृंगारे यांनी केले. पाक - कृती स्पर्धेत  प्रणाली गुरव प्रथम क्रमांक,  रोहिणी मयेकर द्वितीय तर गायत्री राऊळ यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व आरती नेरुरकर यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये देण्यात आले. सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकांना रानभाज्यांचे महत्व व कशा ओळखाव्यात याविषयी राजा शृंगारे यांनी मार्गदर्शक केले.