नेमळेचा वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के

Edited by: विनायक गांवस
Published on: May 21, 2024 09:12 AM
views 720  views

सावंतवाडी : नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळेचा वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला. तर कला शाखेचा निकाल ९२.३९ टक्के लागला. यात वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक गौरवी खोत ७०.६७ %, द्वितीय ऋतिका राऊळ ६६ % तर तृतीय क्रमांक यतिन गावडे ६३.३३ % गुण मिळवत प्राप्त केला. तर कला शाखेत वेदांत मुळीक ७५.८३ % प्रथम, द्वितीय क्रमांक निमिषा धुरी ६१.१७ % तर तृतीय क्रमांक राजेश बिर्जे यान ६०% गुणांसह प्राप्त केला. १२ वी परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीकडून अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.