
वेंगुर्ले : शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत शिक्षक अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये दोडामार्ग इंग्लिश स्कूलच्या उच्च माध्यमिक विभागाकडील श्रीमती नीता नितेश मयेकर यांची वक्तृत्व स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड झाली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सांगली यांच्यामार्फत विभाग स्तरीय स्पर्धा मिरज हायस्कूल मिरज येथे पार पडली या स्पर्धेमध्ये श्रीमती मयेकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला असून त्यांची आता राज्यस्तरावर निवड झाली आहे. सदरील स्पर्धेमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ दिनेश नागवेकर, सचिव व्ही बी नाईक, खजिनदार सी एल नाईक, मुख्याध्यापक संजय पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले.










