
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर यांनी जोरदार प्रचारास सुरुवात केली आहे. घरोघरी जात त्यांनी प्रचारावर भर दिला. शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह प्रचार केला.
प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार वैभव म्हापसेकर व माजी नगरसेविका दिपाली सावंत यांच्यासह त्यांनी प्रचार केला. जनतेचा आम्हाला प्रतिसाद उत्स्फूर्त असून सुशिक्षित, उच्चशिक्षित, सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून माझ्यासोबत जनता राहील असा विश्वास ॲड. निता सावंत-कविटकर यांनी व्यक्त केला. दीपक केसरकर यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर आम्ही विजयी होऊ असा विश्वास उमेदवार वैभव म्हापसेकर यांनी व्यक्त केला. तर जनतेच्या केलेल्या कामाचा जोरावर आम्ही नक्कीच विजयी होऊ, दीपक केसरकर यांच्याशिवाय विकास होऊ शकत नाही असं मत उमेदवार माजी नगरसेविका दिपाली सावंत यांनी व्यक्त केले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, विशाल सावंत, सुधीर धुमे, प्रविण चौगुले आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










