ओ पॉझिटिव्ह रक्तदात्यांची गरज...!

Edited by: विनायक गावस
Published on: August 02, 2023 13:20 PM
views 223  views

सावंतवाडी : एलायझा टेस्ट बंधनकारक करण्यात आल्यानं ओ पॉझिटिव्ह + रक्तगटाच्या दहा रक्तदात्यांची उद्या सकाळी १० वाजता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढी मध्ये आवश्यकता आहे. तरी ओ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या दात्यांनी पुढाकार घेत रक्तदान करत रूग्णांना जीवनदान द्यावं असं आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केल आहे.