
नडगिवे : नॅशनल इंग्लिश मिडिअम स्कूल नडगिवेच्या च्या भव्य पटांगणावर नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी विशेष परिपाठ तसेच प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. प्रवेशोत्सवाच्या विशेष दिनाचे औचित्य साधून शाळेत नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागन करण्यात आले. कार्याध्यक्ष - मा . श्री. रघुवीर राणे सर,शाळेचे सचिव - मा. श्री. मोहन कावळे सर, सह सचिव - मा. श्री.ब्रह्मदंडे सर, मुख्याध्यापिका मा. श्रीमती नीलम डांगे मॅम,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक यावेळी उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्य प्रवेश द्वारातून वाजतगाजत बँड पथकासह फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुशोभित करण्यात आले होते. शेवटी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाची सांगता झाली.